देशात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राच पहिल्य क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद पार पडली. तसेच अजून एक माहिती समोर आली असून त्यानुसार महाराष्ट्रात करोनाचे दोन नवीन प्रकार ( new covid strain ) आढळून आले आहेत. महाराष्ट्रात E484Q आणि L452R हे दोन करोनाचे प्रकार आढळले आहेत. महाराष्ट्रातील १५ ते २० टक्के रुग्णांमध्ये करोनाचा हे नवीन प्रकार आढळले आहेत.
“दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे.” असं राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं. “याशिवात गुजरात, मध्य प्रदेशातही चिंताजनक स्थिती आहे. गुजरातमध्ये दिवसाला १७०० तर मध्य प्रदेशात १५०० रुग्ण सापडत आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण आहेत,” अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे”.
तर देशात आता एका दिवसाला ४७, २६२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या या वर्षातील सर्वात मोठी आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक माहिती दिली आहे. महाराष्ट्रात करोनाचे दोन नवीन प्रकार ( new covid strain ) आढळून आले आहेत. महाराष्ट्रात E484Q आणि L452R हे दोन करोनाचे प्रकार आढळले आहेत. महाराष्ट्रातील १५ ते २० टक्के रुग्णांमध्ये करोनाचा हे नवीन प्रकार आढळले आहेत.
केरळमध्येही करोनाचा नवीन प्रकार आढळला आहे. केरळमध्ये करोनाचा N440K हा प्रकार आढळला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमधून २०३२ नमुने घेतले गेले. यात ११ जिल्ह्यांमध्ये १२३ नमुने हे करोनाच्या नवीन प्रकाराचे आढळून आले. केरळमधील करोनाच्या N440K या नवीन प्रकाराचे आंध प्रदेशात ३३ टक्के नमुने आढळून आले होते. तर करोनाच्या याच नवीन प्रकारचे ५३ टक्के नमुने हे तेलंगणमध्ये आढळून आले. N440K हा करोनाचा नवीन प्रकार १६ देशांमध्ये आढळून आला आहे. पण काही राज्यांमधील वाढत्या करोना रुग्णंसंख्येशी याचा थेट कुठलाही संबंध नाही.
महाराष्ट्रातील नमुन्यांच्या अभ्यासानंतर डिसेंबर २०२० च्या तुलनेत E484Q आणि L452R या करोनाच्या नवीन प्रकारांमध्ये काहीसा बदल झाल्याचं दिसून आलं आहे. या व्हायरसने संसर्ग अधिक वाढतो. करोनाच्या नवीन प्रकाराचे जवळपास १५ ते २० टक्के नमुने आढळून आले आहेत. हे नमुने आधीच्या कुठल्याही नमुन्याशी मेळ खात नाहीत.